Bank has launched EMV chip based Rupay Debit Card. Customer can use on ATM & POS terminal across country.
Bank Debit card now can be used for online purchase like Rail, Flight, Movie tickets booking, Purchase online Product, Bill Payment etc. Any transaction upto Rs. 50,000 can be done online.
GST no. of our bank for Maharashtra is 27AAHCS2732D1ZK & for Karnataka is 29AAHCS2732D2ZF
"Tender Notice"
ABOUT US

१. "लोकल एरिया " यामध्ये सरकार व रिझर्व्ह बँकेला अभिप्रेत असे आहे  की बँक प्रादेशिक सलग अशा तीन जिल्ह्यामध्ये कामकाज करू शकते.  लोकल एरिया बँकेची गरज उद्योजक , व्यावसायिक , शेतकरी व इतर नागरिकांचा विकास करण्याच्या हेतूने स्थापना झाली अहे. लोकल एरिया बँक स्थापनेकरीता १९९६  साली रिझर्व्ह बँकेने राष्ट्रीयकृत बँकेचा लोकसंपर्क  व आपुलकीची जाणीव यांचा विचार करून रिझर्व्ह बँकेने या लोकल एरिया बँकांना परवाना दिलेला आहे . 

२. बँकांचे राष्ट्रीयीकरण करतांना एक विचार असाही होता की समाजातील शेवटच्या घटकेपर्यंत आर्थिक विकासाचा फायदा व्हावा. तळागाळातील लोकांना त्यांचा उत्कर्ष  करता यावा . तथापि, कालांतराने व अलिकडच्या काळात परदेशी बँका आल्या आणि मोठ्या खाजगी बँक आल्या आणि त्यांच्यात प्रचंड अशी स्पर्धा सुरु झाली. 

३. राष्ट्रीयकृत  बँका या आयात - निर्यात तसेच बडे उद्योग यांच्या  गरज पुरवत असताना छोट्या प्रमाणातील सर्वाना सेवा पुरवण्यासाठी काही संस्था असाव्यात. 

४. सहकारी संस्था या फक्त आपल्या सभासदांसाठी काम करतात आणि आपण आता पाहतो कि काही सहकारी संस्थानाही ग्रहण लागल्याचे दिसते. अर्थात सगळयाच संस्था अडचणीत आहेत किंवा चांगले काम करत नाहीत असे नाही .

५. तेव्हा लोकल  म्हणजे स्थानिक लोकांना बँकिंगची , बचतीची सवय लागावी , त्यांच्या कर्जाच्या छोट्या छोट्या गरज लगोलग भागाव्यात अशा हेतूने लोकल एरिया बँकांचा जन्म झाला.

६. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व विकासाचा दृष्टीकोन ठेवून या बँकेची सुरुवात करण्यात आली आहे. थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली या बँकेचा कारभार चालत असून राज्यातील लोकल एरिया बँक ही  पहिलीच आहे. ही देशातील अशा प्रकारची चौथी व राज्यातील पहिली बँक स्थापना केली.

७. अशा ४ बँका कार्यरत आहेत. पंजाब , कर्नाटक , आंध्र व महाराष्ट्र येथे या बँका असून आमच्या ८ शाखा आहेत. बँकेला १०  वर्ष पूर्ण होत आली. अशा प्रकारच्या बँका राज्यात ठराविक ठिकाणी असून महाराष्ट्रात सुरु असलेली सुभद्रा लोकल एरिया बँक लि . ही एकमेव लोकल बँक अहे. या बँकेचे कामकाज आरबीआयच्या नियंत्रणाखाली होत अहे.

८. आमच्या ८ शाखा पैकी ३ स्वत:च्यात इमारतीत आहे. भाग भांडवल हे केवळ प्राथमिक प्रमोटर्सचे असून अन्य सभासद नाहीत. तथापि बँक भक्कम आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार आपली बँक कार्यरत असून पूर्णतः भक्कम अहे.

९. आमच्या बँकेचे व्याजदर ठेवीसाठी राष्ट्रीयीकृत बँकापेक्षा जास्त आहेत व कर्जावरील व्याजदर प्रस्तावाचे गुणवत्तेनुसार असतात. सर्व साधारणपणे दोन लाख रुपयांपर्यतच्या व्यवसायाच्या कर्जासाठी सव्वा बारा टक्के दर आहे .

१०. बँकेचे सर्व कामकाजावर बारकाइने लक्ष ठेवण्याचे दृष्टीकोनातून, खातेदारांना आपुलकीने आणि आस्थेवाइकतेने सेवा देता येणाच्या दृष्टीने आम्ही हि सेवा अत्यावश्यक  मानतो आणि मोठे असण्यापेक्षा छोटे पण भक्कम राहूनही सर्वाची सेवा करता येवू शकते हे आम्हास अनुभवाने माहिती आहे.

११. आमच्या बँकेने ड्राफ्टसाठी काही बँकांशी सहकार्य करार केले असल्याने भारतातील कोणत्याही ठीकाणचे डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक आम्ही देतो.

१२. अत्याधुनिक फंड ट्रान्सफर साठी आर. टी. जी . एस . व एन. इ. एफ. टी. प्रणाली आम्ही अनेक बँकामार्फत राबवतो व आमचे खातेदार त्याबाबत समाधानी आहेत.

१३. ठेव विमा आहे, एक लाख रु.प्रती खातेदार विमा आहे.

१४. कर्ज सर्व प्रकारची उपलब्ध आहेत. शेती, व्यवसाय, उद्योग, दुर्बल घटकास, स्त्रीयांना, व्यवसायासाठी अल्प दरांतही कर्जे उपलब्ध आहेत, मात्र कर्जाचा परतावा होवू शकतो की नाही याची कठोर शहानिशा आम्ही करतो अन्यथा कर्ज देत नाही.

१५. एन. पी. ए. चे एखादेही मोठे उदाहरण नाही अर्थात एन. पी. ए. अल्पांश टक्क्यावर आहे. वसुली १०० टक्के आहे. संचालक मंडळ मोजक्या व निवडक व्यक्तींचे असून पूर्णतः सचोटीने काम करणारे आहेत. सर्वसामान्य व प्रामाणिकपणे व्यापार उद्योग करू पाहणाऱ्यांना आपली बँक कर्ज देते.

१६. बँकेचे संचालक मंडळ, त्यांच्या संस्था, त्यांचे कोणतेही नातेवाईक किंवा नातेवाईकांच्या संस्था, दुकाने , कारखाने यानां कसल्याही प्रकारचे कर्ज देता येणार नाही असा दंडक आहे. आणि तो तंतोतंत पाळला जातोच.

१७. नफा वाढता आहे याला मुख्य कारण म्हणजे आमचे संचालक कोणताही भत्ता अगर व्यक्तिगत खर्च, प्रवास खर्च घेत नाहीत. तसेच कर्मचारी , अधिकारी व उच्चपदस्थ या सर्वा चा व्यवहार हा अत्यंत काटकसरीचा असतो. बँकेचे भागधारकही अल्प डिव्हीडंड मिळाला तरीही बँकेचे प्रगतीपथावर असण्याने समाधानी असतात. एकूणच अत्यावश्यक खर्च केले जावून काटकसरीचा कटाक्ष ठेवून कोणतीही उधळपट्टी केली जात नसल्याने जनसामान्यांना याचा लाभ होतो.

१८. संचालक मंडळ अनुभवी व निःस्वार्थी आहे.

१९. व्यवस्थापकीय संचालक हे बँकिंग तज्ञ आहेत व त्यांना मदत करण्यासाठी अनुभवी व्यवस्थापक, हेड ऑफिसमध्ये कार्यरत अहेत. शिवाय सर्व शाखांमध्ये असलेले शाखाप्रमुख व अधिकारी आणि सेवकवर्ग प्रामाणिकपणे काम करतात याचा अतिशय आनंद आहे.

२०. भाग भांडवल पर्याप्तता १५ टक्के असायला हवी ती ७० टक्के आहे. म्हणजे बँकेला कर्ज व्यवहार वाढविण्यास खूप मोठी संधी आहे .

२१. आमच्यावर नियंत्रण रिझर्व्ह बँकेचे असते. दर वर्षी सर्वकश तपासणी होते. नियमाप्रमाणे संचालक मंडळ निर्णय घेते ना. संचालकांच्या निर्देशानाप्रमाणे व्यवस्थापक कार्यरत आहेना, याबाबत चिकित्सा होते. दर तिमाही प्रगतीचा लेखा जोखा रिझर्व्ह बँक मुंबईला बैठक घेवून चर्चा करते. मार्गदर्शन करते. संपूर्णपणे सहाय्कारी भूमिकेतून रिझर्व्ह बँक लक्ष ठेवते असे म्हंटले तर योग्य होइल.

२२. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की, बँकेने सतत नफा वाढीमध्ये सातत्य टिकवले तर आहेच पण दहा वर्षांनीदेखील एन. पी.ए . म्हणाल तर १ टक्क्यापेक्षा कमीच आहे. आणि वसूली करण्याची सर्व तयारी केली आहे. यश आमचेच असेल यात शंका नाही.